संसारातील आहे गोड एकच नाव
बोला जय जय विठ्ठल, बोला जय जय पांडुरंगा
नाही त्यात काही कटकट, आहे सोप्पं नांव - बोला ...
आहे त्यात शक्ति भरपूर, तारतो तो संसारात - बोला...
भागीरथी तटवासी, आहे तो अंतर्यामी, माझा विठ्ठल - बोला...
भक्तासाठी उभा राहिला तो विटेवर, तो माझा विठ्ठल - बोला...
वैकुंठ सोडून आले धरतीवर, उभे राहिले विटेवर, तो माझा विठ्ठल - बोला...
कमी नाही वैकुंठात काही, आहे कमी ती भक्ताची - बोला...
उणीवपूर्ण करितां आलो धरतीवरी, आलो पंढरपूरला, माझा विठ्ठल - बोला...
सतगुरू देवेंद्र घिया (काका)