आता मला जीवनात शांति हवी, आता मला जीवनात शांति हवी
जीवनभर केलं काम, फायदा त्याचा काही मिळाला नाही
नित्य दुःखे जीवनात मिळाली, मी दमलो आता जीवनात
नजर माझी सगळी फिरली, माझं म्हणू असं कोणावर नाही ठरली
वैरझेरांच्या गल्लीत फिरलो, शांतिची गल्ली आता मला हवी
माझं-तुझं भेद नाही विसरलो, दुःखाच्या गल्लीत फिरलो
जीवनातील प्रसंगानी शिकवलं- कोण माझा, कोण नाही
अनेक प्रसंगाची गाठ मनात पडली, ती जीवनात सुटली नाही
निराशाच्या वातावरणात जगलो, काही वेळा निराशेत फिरलो
अन्यांची उपाधि घेऊन जगात फिरलो, आता मला जीवनात शांती हवी
सतगुरू देवेंद्र घिया (काका)