देवाने दिले जगात… देवा साठी वापरु या…
दिले तन देवाने... देवा साठी तन वापरु या...
दिली बुद्धि देवाने... त्याशी त्याला समजू या...
दिली दृष्टि देवाने... सगळे देवाला पाहू या...
पाय दिले देवाने... सुकर्म त्याने करू या...
जीभ दिली देवाने... नाम देवाचे नित घेऊ या...
हात दिले देवाने...देवाला नमस्कार करु या...
विचार दिले देवाने...देवाचा विचार करु या...
दिल हृदय देवाने... भक्तिभावाने ते भरु या...
जीवन दिलं देवाने... जीवन अर्पण त्याला करू या...
सतगुरू देवेंद्र घिया (काका)