Hymn No. 4827 | Date: 23-Jul-1993
|
|
Text Size |
 |
 |
चला आपण जीवनात मेहनत करु या, सुखाने जगू या, सुखाने जगू या जगात पापाची संगत सोडून, पुण्याच्या रस्त्यावर चालू या, सुखाने जगू या, सुखाने जगू या हयांसी वैर द्वेष मिटवून, प्रेमांच्या वाटेवर चालू या, सुखाने जगू या, सुखाने जगू या मनातील काम क्रोध सोडून, धर्माच्या पथावर स्थिर होवु या, सुखाने जगू या, सुखाने जगू या भक्तिचा प्याला जीवनात नित्य पिऊया, प्रभुला ना विसरुया, सुखानी जगू या श्रद्धासी बलवंत होवु या, जीवनात सत्यावर निष्ठा ठेवू या, सुखानी जगू या तुफानाशी करुन सामना, जीवनात हिंमतीने चालू या, सुखानी जगू या, सुखानी जगू या धर्माच्या पथावर पूढे चालू या, पावले मागे ना टाकू या, सुखानी जगू या, सुखानी जगू या अन्य जीवांवर प्रेम करुया, जीवनांत अपमान विसरुया, सुखानी जगू या, सुखानी जगू या
सतगुरू देवेंद्र घिया (काका)
|
|