दत्तगुरु गुरुशिखरावर
by सौ. मानसी शेवडे (ग्राफिक डिझायनर) on 24 Jun 2020
घरातील सर्वांचा निरोप घेऊन मी माझ्या बहिण व जीजाजीं बरोबर व त्यांच्या कडील फॅमिली मेंबर्स सोबत २३ डिसेंबर २०१९ रोजी गिरनार च्या दत्तगुरु गुरुशिखरावर जाण्यास निघालो. राजकोटला जुनागढ च्या एका लहान हॉटेलमध्ये सर्वांनी रात्री ९.०० वाजता गरमागरम खिचडी कढी खाल्ली. आणि लम्बे मारूतीचे दर्शन घेऊन डोंगराच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. प्रत्येक पायरीला आपापल्या इच्छीत देवाचे, स्वामींचे स्मरण करत होतो. चालण्याची सवय नसल्यामुळे २०० पायऱ्यांपर्यंत पायात गोळे आले होते. १००० पायऱ्या चढून झाल्यावर अंबे मातेच्या देवळात दर्शन मिळणार होते. आमच्या स्पीड ने पायऱ्या चढत चढत आम्ही ८०० पायऱ्यांपर्यंत गेलो असु, तिथेच एके ठिकाणी एक कच्छी माणूस व त्याची बायको गरमागरम चहा आणि बिस्कीटे विकत होती. आमच्या जवळचे पाणि संपले होते. थोडा वेळ तिथे बसून चहा पिऊन नंतर पुढे जायचे ठरले.
तो माणूस बराच जुना असल्याने सर्वांना तो तेथील अंबेमातेची व दत्तगुरुंच्या प्रचीतीच्या गोष्टी सांगत होता.
मुंबईत मी अल्पा मॅडम व डॉ. ईरा मॅडम सोबत काकाजींचे (परम पुज्य देवेंद्र घीया) पुस्तकाचे काम करत असल्याने त्यांच्या तोंडूनही गिरनारच्या व काकाजींच्या बऱ्याच गोष्टी मी ऐकल्या होत्या. मला एकदम हे आठवले व त्या चहावाल्याला मी विचारले. ‘‘तुम्ही काकाजींना जाणता काय?“ तो क्षणभर माझ्याकडे एकटक बघतच राहिला. एक महाराष्ट्रीयन बाई काकाजींबद्दल कसे काय विचारते याचे त्याला बहुतेक आश्चर्यच वाटले असेल. तो म्हणाला, ‘‘अहो तुम्ही काकाजींना जाणताच ना...ते आम्ही कधीच विसरु शकत नाही....तुम्ही निश्चींत मनाने कुठलेही भय न बाळगता त्यांचे स्मरण करीत जा तुम्ही तुमचे इप्सित स्थळ विनासायास मिळेल हे नक्की.
आणि खरोखर सांगते तेथील चहा प्यायल्यावर जी उर्जा आम्हाला मिळाली त्याने मजल दर मजल करीत, न थकता पहाटे ४ वाजता आम्ही श्रीदत्तगुरुंच्या चरणी रुजू झालो. पायात एवढा प्रॉब्लेम असताना मलाच आश्चर्य वाटलं की एवढी उर्जा आली कुठून. पण खरं सांगू काकाजींचे स्मरण करुन आम्ही चढायला सुरुवात केली ना त्यांनीच आम्हाला गुरुशिखरापर्यंत पोहचविलं.....जय दत्तगुरु....जय काकाजी.....