आयुष्यात करायचं ते केलं नाही, केलं नाही
जग सोडायची वेळ आली, वेळ आणखी मिळणार नाही
पोटासाठी हिंडलात इथे तिथे, वेळेचा उपयोग केला नाही
व्यवहारात गुंतून इथे, नाव प्रभुचे घेतले नाही
आयुष्यात गोळा केली लक्ष्मी, उपयोग करण्याचा वेळ मिळाला नाही
इतरांचे दोष काढत राहिलात, स्वतःचा दोष दिसला नाही
मनाच्या संयमावर दिलं भाषण, स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवलं नाही
प्रभुचे भजन, भाषण केलं जास्त, प्रभुला जवळ आणलं नाही
सतगुरू देवेंद्र घिया (काका)